आम्रखंड आईस क्रीम | श्रीखंड आईस क्रीम | Amrakhand Ice-Cream | Summer Special | उन्हाळा विशेष | Recipe Theatre

आम्रखंड कसा बनवायच याचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता:

आम्रखंड

img_20210418_184119_770-1

पूर्व तयारी : ४ तास

रेफ्रिजरेट वेळः ८ तास

प्रकार: आईस क्रीम

सर्व्ह: ४ 


साहित्य:

 •  १ कप दही (चक्का)
 • १ कप आंब्याचा गर
 • १ कप पिठी साखर
 • २ चमचे केशर दूध
 • १ चमचा बदाम (तुकडे)
 • १ चमचा काजू (तुकडे)
 • १/२ चमचा वेलची पूड
 • १/४ चमचा जायफळ पूड
 • २ चमचे फ्रेश मलई
 • १ चमचा कस्टर्ड पावडर
 • पिस्ता (गार्निशिंगसाठी)

पद्धतः

चक्का कसा बनवायचा:

 • स्वच्छ मलमल किंवा सुती कपड्यात २ कप दही घ्या.
 • कमीत कमी २ तास पाणी निथळण्यासाठी टांगून ठेवा.
 • १ तासासाठी वापरण्यापूर्वी फ्रिज मध्ये ठेवा.
 • चक्का तयार आहे.

आम्रखंड कसा बनवायच:

 • सर्व प्रथम आंबा स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचा गर काढून घ्या.
 • केशर चे पराग २ चमचे कोमट दुधात भिजत ठेवा.
 • एका मोठ्या भांड्यात १ कप चक्का घ्या.
 • रवी किंवा हॅन्ड ब्लेंडरच्या सहाय्याने चांगले एकत्र करून घ्या.
 • १ वाटी आंब्याचा गर घाला आणि एकत्र करून घ्या.
 • १ कप पिठी साखर घालावी आणि चांगले ढवळावे की साखर दहीमध्ये वितळली जाईल.
 • आता त्यात केशर दूध, १ चमचा बदाम, १ चमचा काजू, १ चमचा वेलची पूड व १/४ चमचा जायफळ पूड घाला आणि चांगले मिसळा.
 • आम्रखंड तयार आहे.

img_20210408_172519


आम्रखंड आईस्क्रीम कसा बनवायच:

 • एका वाटीमध्ये २ चमचे फ्रेश मलई घ्या आणि त्यात १ चमचा कस्टर्ड पावडर घाला.
 • नीट ढवळून एकत्र करून घ्या म्हणजे गुठळ्या राहणार नाही.
 • फ्रेश मलई व कस्टर्ड पावडर मिश्रणात १ कप आम्रखंड घाला आणि सर्वकाही चांगले मिसळून घ्या.
 • आता हे मिश्रण हवा बंद डब्यात घाला आणि ८ तासांसाठी फ्रिज मध्ये ठेवा.
 • नंतर वरून पिस्त्याचे काप घालून थंडगार सर्व्ह करा आणि आनंद घ्या.

img_20210418_184119_770-1

Rating: 5 out of 5.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s